Fastest Fifty In IPL.आयपीएल २०२३ चा सीझन मोठ्या दंग्यात सुरू आहे. रोज प्रत्तेक मॅच ला ज्याची अपेक्षा नाही अश्या खेळी खेळाडू खेळताना दिसताहेत. प्रत्तेक खेळाडू आपल्या पद्धतीने राडा घालतोय. कोण स्टेडियम च्या बाहेर बॉल मारतोय,कोण अशक्य वाटणारा कॅच लीलया टिपतोय , कोण आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवतोय तर कोण आपल्या बॅट ने धुराळा उडवतोय.
      आजपर्यंतच्या आयपीएल मधे बऱ्याच बॅट्समन ने तुफानी खेळया केल्या आहेत. आज आपण या आजच्या लेखात अश्याच तूफान खेळयांपैकी कमी चेंडूत अर्धशतक कोणी मारले आणि आयपीएल इतिहासात कमी चेंडूतील अर्धशतकाचे रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे हे पाहणार आहोत. 

Fastest Fifty In IPL.
Fastest Fifty In IPL.

Fastest Fifty In IPL.


आयपीएल ची या सीझन ची सुरुवात ३१ मार्च ला झाली. पहिली मॅच गुजरात आणि चेन्नई या दोन टीम मधे झाली आणि सुरुवातीच्या या पहिल्या मॅच पासूनच बॅट्समन नी राडा घालायला सुरुवात केली.
        या सामन्यात चेन्नई संघाकडून खेळणाऱ्या पुण्याचा असणाऱ्या ऋतुराज ने ५० बॉल चा सामना करत तब्बल ९० धावा केल्या. त्याने त्याच्या या पूर्ण खेळीत गुजरातच्या साऱ्या गोलंदाजांना उखळात घातलं,त्यावर चौकारांच्या मिरच्या आणि षटकारांचा खडा मसाला टाकला आणि कूट कूट कुटलं.
      चौफेर फटकेबाजी करत त्याने साऱ्या गोलंदाजांची कोल्हापुरी झटका असणारी चटणी करून टाकली. 'Fastest Fifty In IPL'
         गुजरात कडून ही शुभमन गिल ने या खेळीला तोडीस तोड म्हणून चेन्नई च्या गोलंदाजांची बेसन पिठात टाकून धुलाई केली आणि त्यांच्या गोलंदाजीचा फाफडा करून टाकला. 


Fastest Fifty In IPL.
Fastest Fifty In IPL.



पहिल्या सामन्यात सुरू झालेला हा फलंदाजांचा दंगा प्रत्तेक सामन्यागणिक वाढतच आहे. या साऱ्या दंग्यात मात्र एका खेळाडूचा दंगा भाव खाऊन गेला. तो म्हणजे nicholas pooran. 

      १० एप्रिल ला झालेल्या बेंगलोर  विरुद्ध लखनऊ या  सामन्यात  बेंगलोर ने २१२ एवढा धावांचा डोंगर उभा केला. यात duplesis आणि कोहलीने लखनऊच्या गोलंदाजांच्या चिंध्या करून टाकल्या. duplesis मारलेला एक चेंडू तर अगदी स्टेडियम च्या बाहेर गेला. ते पाहून कदाचित त्या गोलंदाजाला आपण क्रिकेट मधून लगेच संन्यास घ्यावा असं फीलिंग त्याक्षणी आले असेल. 

Fastest Fifty In IPL.

       या धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या लखनऊ च्या फलंदाजांची काहीशी भंबेरी उडाली, परंतु stonis आणि pooran या दोघांनी मैदानात येऊन असे काही तांडव घातले की बेंगलोर च्या संघमालकाला एवढ्या वर्षाचा आपल्या संघाचा badpatch घालवायला आता कोणत्या बाबाकडे जाऊन अशिर्वाद घ्यावा असा प्रश्न पडला असेल. 
      pooran चा carebian धुडगूस तोंडात बोटे घालून ती चावून खाण्यासारखा होता. एवढा मोठा स्कोर करूनही बेंगलोर भुईसपाट झाली आणि लखनऊने हा सामना जिंकला. Fastest Fifty In IPL.

Fastest Fifty In IPL.
Fastest Fifty In IPL.


        यात सर्वात मोठा वाटा होता pooran चा त्याने या सामन्यात केवळ १५ चेंडूत अर्धशतक ठोकले. बेंगलोर च्या गोलंदाजांची सारे कपडे काढत,त्याने १९ चेंडूत ६२ धावा केल्या आणि २०२३ या सीझन चे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचे रेकॉर्ड तूर्तास तरी आपल्या नावावर करून घेतले आहे. 
     ते आता आपल्याच नावावर राहील असा गैरसमज त्याने करून घेऊ नये. भावा तुझा धुडगूस भारी असला तरी हे आयपीएल आहे आणि इथे सारेजण सारख्याला वारके आहेत हे विसरू नको. 

Fastest Fifty In IPL.


आता तुम्हाला वाटेल की pooran चे हे रेकॉर्ड आयपीएल च्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक म्हणून नोंदवलं गेलं असेल. पण हा असा विचार करण्याचा अचरटपणा उगाच करू नका. हे रेकॉर्ड एका भारतीय खेळाडूच्या नावावर आहे. 

        हार्दिक पांड्या सोबत एका इंटरव्ह्यु ला जाऊन नको त्या प्रकरणात अडकलेला आपला भाऊ आठवतोय ना. हा हा तोच kl राहुल. 
     आयपीएल मधील सर्वात वेगवान अर्धशतक त्याच्या नावावर आहे. १४ चेंडूत ५० धावा त्याने केल्या होत्या. त्यावेळी तो पंजाब संघाचा भाग होता आणि हा चमत्कार त्याने २०१८ च्या आयपीएल मधे केला होता. 

kkr कडून खेळणाऱ्या pat cummins ने मात्र हे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याचा २०२२ च्या सीजन मधे मोठा प्रयत्न केला पण राहुल च लकच म्हणा, cummins ही १४ बॉल मधे ५० धावा इथे येऊन अडकला आणि हा रेकॉर्ड दोघांच्या नावावर झाला. 
        भले दोघांनी १४ चेंडूत अर्धशतक केले असले तरी सर्वात आधी राहुल ने हे अर्धशतक ठोकले आहे त्यामुळे साहजिकच या रेकॉर्ड मधे cummins च्या अगोदर राहुलचेच नाव आहे. "Fastest Fifty In IPL"

      आता हे झाले रेकॉर्ड चे परंतु आयपीएल सर्वात आधी कमी चेंडूत अर्धशतक कोणी ठोकले?असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर त्याचे उत्तर आहे. गिली म्हणजेच अॅडम गिलख्रिस्त. त्याने २००९ च्या सीजन मधे १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्यावेळी ती डेक्कन चार्जर कडून खेळत होता. 

   आयपीएल मध्ये वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या पहिल्या ५० खेळाडूंची यादी काढली तर तिथे तुम्हाला वॉर्नर, pollard, raina, यूसुफ पठाण, धोनी,पांड्या,सहवाग,buttler सारखे दिग्गज खेळाडू तर तुम्हाला दिसतीलच पण या ५० खेळाडूंमध्ये हरभजन, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन यासारखे गोलंदाज ही दिसतील. 

नरेन ने १५ चेंडूत तर हरभजन ने १९ आणि ठाकूर ने २० चेंडूत हा कारनामा केला आहे. 

      रेकॉर्ड हे कधीही कायम राहत नसतात ते मोडले जात असतात त्यामुळे भविष्यात तुम्हाला या यादीमध्ये बराचसा बदल झालेला दिसला तर काही मोठी आश्चर्याची गोष्ट नसेल. शेवटी हे क्रिकेट आहे आणि इथे काहीही शक्य आहे. 

हा लेख तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रावर्गामध्ये जरूर शेअर करा. 

धन्यवाद.