First run,first wicket first boundary in IPL history. आयपीएलच्या इतिहासात पहिली धाव कोणी काढली, पहिला चौकार न षटकार कोणी मारला, पहिली विकेट कोणी घेतली आणि पहिली मॅच कोणत्या संघात झाली आणि कश्याप्रकारे ती रंगली याबद्दल आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
![]() |
| First run,first wicket first boundary in IPL |
First run,first wicket first boundary in IPL history.
31 मार्च 2023 ला आयपीएल चा सीझन सुरू होतोय. वातावरण आयपीएलमय होऊ लागलंय . प्रत्तेक टीमच्या चाहत्यांमध्ये या वेळचा कप कोण घेऊन जाणार यावर घमासान सुरू आहे . कोण किती रन्स करेल ?कोण किती विकेट्स घेईल? याच्या पैजा लागू लागल्या आहेत आणि यावेळचा सीझन कसा एंजॉय करायचा याचा आराखडा प्रत्तेकच्या डोक्यात तयार आहे.
![]() |
| First run,first wicket first boundary in IPL |
आयपीएल चा हा १६ वा सीझन असेल. ज्याची सुरुवात ३१ मार्चला गुजरात आणि चेन्नई यांच्यात होणाऱ्या लढतीने होईल. जी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या स्टेडियम वर खेळली जाईल. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट प्रेमींना आयपीएल केव्हा सुरू होईल याबद्दल जर वर्षी उत्सुकता लागलेली असते एवढी लोकप्रियता या क्रिकेट लीग ने प्राप्त केली आहे. 'First run,first wicket first boundary in IPL'
पण सुरुवातीला अशी लीग स्पर्धा आपल्या देश्यात सुरू करावी का नाही याबद्दल बराचसा संभ्रम होता. ही स्पर्धा आपल्या इथे लोकप्रिय होईल की नाही याबद्दलही शंका उपस्थित केली जात होती. पण बऱ्याचश्या किंतु, परंतु बाजूला सारून बीसीसीआय ने या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला आणि शेवटी १८ एप्रिल २००८ ला पहिल्या वहिल्या आयपीएल सीझन ला सुरुवात झाली.
![]() |
| First run,first wicket first boundary in IPL |
या सीजन मधे चेन्नई , बेंगलोर,डेक्कन चार्जर, पंजाब,मुंबई, राजस्थान, कोलकत्ता आणि दिल्ली या ८ टीम सहभागी झाल्या होत्या. यातील बेंगलोर आणि कोलकत्ता या टीम मधे आयपीएल चा पहिला सामना झाला.
आयपीएल सुरू व्हायच्या काही दिवस अगोदरच भारताने टी २० वर्ल्ड कप जिंकला होता.या क्षणक्षणाला रोमांचित करणाऱ्या नव्या फॉरमॅट चे भारतीय लोक मोठे दिवाणे झाले होते. त्यामुळेच आयपीएल स्पर्धा लाँच करण्याची हीच खरी वेळ आहे असे कदाचित आयोजकांना वाटले असेल.
आयपीएलचा पहिला सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एम. चिन्नास्वामी स्टेडियम अगदी तुडुंब भरले होते आणि तिथली गर्दी ओसंडून वाहत होती.
First run,first wicket first boundary
टॉस उडाला आणि बेंगलोर ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. बेंगलोर ची टीम मैदानात उतरली. कॅप्टन राहुल द्रविड ने फिल्डिंग लावून घेतली. कोलकत्ता टीम चे दोन opener कॅप्टन सौरव गांगुली आणि न्यूझीलंड चा ताबडतोड फलंदाज असणारा ब्रॅंडम McCullum मैदानात उतरले. रात्रीच्या ८ चा टोल झाला आणि आयपीएल लीग ची मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. पहिली ओवर प्रवीण कुमार टाकत होता आणि आयपीएल च्या इतिहासातील पहिला बॅट्समन होण्याचा मान सौरव गांगुलीला मिळाला होता.
![]() |
| First run,first wicket first boundary in IPL |
प्रवीण कुमार ने पहिली ओवर चांगली टाकली. पुढची ओवर झहीर खान ने घेतली आणि तिथूनच आयपीएल मधील घणाघात सुरू झाला. McCullum ने चौकार आणि षट्कारांची आतिषबाजी करायला सुरुवात केली. आयपीएल चा पहिला चौकार आणि षटकार McCullumच्या बॅट मधून निघाला.First run,first wicket first boundary in IPL
दुसऱ्या ओवर मधे McCullumची सुरू झालेली फटकेबाजी अगदी २० व्या over पर्यन्त चालू होती. गगनभरारी घेत सीमेपार जाणारा चेंडू पाहून प्रेक्षकांच्या जल्लोषाला उधाण आले. ते पाहून आयोजकांना लीग स्पर्धेच्या यशाची खात्री होऊ लागली होती.
McCullum ने तब्बल १० चौकार आणि १३ षटकार मारले आणि आयपीएल च्या इतिहासातील केवळ पहिले शतकच नाही तर दीड शतकही आपल्या नावावर केले. त्याने ७३ चेंडूत नाबाद १५८ धावा कुटल्या. २० षटकाअखेर कोलकत्ता टीम चा स्कोर ३ बाद २२२ झाला. ज्यातील १५८ रन्स एकट्या McCullum ने काढल्या होत्या.
आयपीएल च्या पहिल्या मॅच मधील McCullum ची ही इनिंग प्रत्तेकाच्या स्मरणात जागा करून गेली आणि ही नव्याने सुरू झालेली क्रिकेट आयपीएल लीग कश्याप्रकारची असणार आहे याची चुणूक दाखवून गेली.
२२२ या धावसंख्येचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या बेंगलोर टीम ने कोलकाता टीम च्या गोलंदाजापुढे अक्षरक्ष लोटांगण घातले. प्रवीण कुमार व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला साधी वैयक्तिक दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही आणि बेंगलोरचा पूर्ण डाव केवळ ८२ धावांवर आटोपला.
हा सामाना कोलकत्ता ने १४० रन्स नी जिंकला आणि आयपीएल मधील पहिला विजय नोंदविला. सोबत पहिला पराभूत संघ म्हणून बेंगलोर टीम भारतीयांच्या कायम लक्षात राहिली.
![]() |
| First run,first wicket first boundary in IPL |
First run,first wicket first boundary in IPL
कोलकत्ता तर्फे अजित आगरकर ने उत्तम गोलंदाजी करत ४ ओवर मधे २५ धावा देत ३ विकेट घेतल्या सोबत गांगुलीने २ आणि अशोक डिंडा ने २ विकेट्स घेत आगरकरला चांगली साथ दिली.या पहिल्या आयपीएल मॅच साठी अम्पायर म्हणून असद रौफ आणि रुडी कोर्टझें यांनी काम पाहिले. आयपीएल च्या इतिहासातील पहिली रन,पहिला चौकार आणि पहिला षटकार McCullum च्या बॅट मधून आला. पहिली विकेट गांगुलीची गेली आणि ती जहीर खान याने घेतली. आयपीएल चा पहिला बॉल प्रवीण कुमार ने टाकला आणि पहिला बॉल गांगुली ने खेळला. आयपीएल इतिहासातील पहिली रन लेग बाय ने आली होती.
भले आपली होम टीम असणारी बेंगलोर पराजित झाली असली तरी McCullum ची त्या अतिशी फलंदाजीचा मनमुराद आनंद तिथे उपस्थित असणाऱ्या साऱ्या प्रेक्षकांनी घेतला."First run,first wicket first boundary in IPL"
अश्या धमाकेदार सामन्याने आयपीएल लीग ची सुरुवात झाली होती. त्यावेळी पहिल्या मॅच ला सुरू झालेला धमाका अजूनपर्यंत सुरूच आहे आणि प्रत्तेक क्रिकेट प्रेमी याचा आनंद लुटत आहेत.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे अवश्य सांगा.





0 Comments